Maval Corona Update : आज नव्या रुग्णांची संख्या वाढली; दिवसभरात 17 रुग्ण पॉझिटिव्ह

Today the number of new patients increased, 17 patients positive during the day तळेगाव, सुदुंबरे, वडगाव, साते, दहिवली, देवले येथे रुग्ण

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असून दिवसभरात 17 नवीन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये तळेगाव, सुदुंबरे, वडगाव, साते, दहिवली, देवले येथील रुग्णांचा समावेश असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्यधिकारी चंद्रकांत लोहारे यांनी दिली.

साते, दहिवली, देवले, वडगाव येथे प्रत्येकी एक रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे तर तळेगाव दाभाडे येथे 7 तर सुदुंबरे येथे 6 रुग्ण आढळले आहेत. असे एकूण 17 रुग्ण आज दिवसभरात पॉझिटिव्ह आढळले आहेत. दररोज आढळणाऱ्या नवीन रुग्णसंख्येचा तुलनेत आज नवीन रुग्णांची संख्या वाढलेली  दिसते. आज अखेर दहा जण बरे झाल्याने त्यांना घरीसोडण्यात आले.

फ्लोरा सिटी येथील 32 वर्षीय व्यक्ती, जैन  मंदिर तळेगाव येथील 40 वर्षीय व्यक्ती, समर्थ निवास, इंद्रायणी काॅलनीमधील 32 वर्षीय व्यक्ती, राव काॅलनी ,कुलदीप रेसिडेन्सी 49 वर्षीय व्यक्ती, रेनो काॅलनीतील 24 वर्षीय व्यक्ती, प्रभाग क्र 8 मधील जव्हेरी काॅलनीतील 48 वर्षीय व्यक्ती, बालाजी अपार्टमेंट इंद्रायणी काॅलनी मधील 35 वर्षीय व्यक्ती, वरील सर्वांना लक्षणे आढळल्याने, स्वॅब घेण्यात आला होता आज सर्वांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.

आजअखेर तालुक्यातील कोरोनाबधित रुग्णांची संख्या 279 झाली असून यापैकी नऊ जणांचा मृत्यू तर 105 जणांना घरी सोडण्यात आले आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 165 असून यापैकी 121 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर 44 जणांवर होम क्वारंटाईन करून उपचार सुरू आहेत अशी माहिती वैद्यकीय अधिकारी गुणेश बागडे यांनी दिली.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीतील आजपर्यंत आढळलेल्या कोरोना रूग्णांची संख्या 77 असून त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला असून 42 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 32 जण उपचार घेत आहेत. अशी माहिती मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.