Maval Corona Update: कोरोनामुक्तीच्या दिशेने! तालुक्यात उरले फक्त 341 सक्रिय रुग्ण

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्याची वाटचाल कोरोना मुक्तीकडे होत आहे. मावळ तालुक्यात 341 रुग्ण आहेत. रुग्ण संख्येपेक्षा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.  बुधवारी (दि.11) 23 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात  दिवसभरात 87 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही,  आतापर्यंत 523 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 341 आहे.

शहरी भागात 18 तर ग्रामीण भागात 5 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 13 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत एकही रुग्ण सापडला नाही. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 5 रुग्ण सापडले.

 तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंत ची एकूण संख्या 26,339 झाली आहे. तर दिवसभरात 87 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

बुधवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात कामशेत, वराळे, इंदोरी, नवलाख  उंब्रे व सोमाटणे प्रत्येकी 1 असे एकूण 5 रुग्ण सापडले.

आतापर्यंत 25,475 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 523 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 8,279, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 4365 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1,320 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 13,964 रुग्ण तर ग्रामीण भागात 12,375 रुग्ण आढळून आले आहेत.

एकही रुग्णाची परिस्थिती गंभीर नाही. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 96.72 टक्के आहे तर मृत्यू दर 1.99 टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे  नगरपरिषद मध्ये 83 लोणावळा नगरपरिषद मध्ये 42 वडगाव नगरपंचायत मध्ये 24 व ग्रामीण भागात 292 असे एकूण 341 रुग्ण आहेत, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.