Maval Corona Update: कडधे आणि माऊ येथील दोन महिला कोरोना पॉझिटीव्ह; सक्रिय रुग्णांची संख्या पाचवर

Maval Corona Update: Two female corona positive from Kaddhe and Mau; The number of active patients is five कडधे आणि माऊ गावांचा संपूर्ण परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. कडधेजवळील करूंज, आर्डव व येळसे तसेच माऊशेजारील दवणेवाडी, मोरमारवाडी या दोन वाड्या बफर झोनमध्ये आहेत.

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात सात दिवसांच्या विश्रांतीनंतर सोमवारी (दि. 8) पवन मावळातील कडधे येथे 48 वर्षीय व्यक्ती कोरोना पाॅझिटिव्ह आढळली होती. पुन्हा दोन दिवसाच्या ब्रेक नंतर कडधे येथील 70 वर्षीय महिला व आंदर मावळातील माऊ येथील 77 वर्षीय महिला या दोन्ही महिलांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला असल्याची माहिती मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिली. सध्या मावळ तालुक्यामध्ये सक्रिय रूग्णांची संख्या पाच आहे.

कडधे येथील 70 वर्षीय महिला हा दुसरा रूग्ण असून जिल्हा रूग्णालय औंध येथे दाखल असून माऊ येथील 77 वर्षीय महिला तळेगाव दाभाडे येथील डाॅ भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल आहेत. सदर महिला ही मागील आठवड्यात मुंबईवरून आलेली होती दोन दिवसापूर्वी खोकला व ताप असल्याने तळेगाव येथे तपासणीसाठी आणले होते. त्या ठिकाणी त्यांची चाचणी करण्यात आली असता चाचणी अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आला. या दोन्ही रुग्णाच्या निकटच्या संपर्कातील आठ-आठ जणांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात येणार आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डाॅ चंद्रकांत लोहारे यांनी सांगितले.

दरम्यान, कडधे गावाचा संपूर्ण परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. करूंज, आर्डव व येळसे ही तीन गावे बफर झोनमध्ये आहेत, तर  माऊ कंटेन्मेट झोन आणि दवणेवाडी, मोरमारवाडी या दोन वाड्या बफरझोन आहेत. असे मावळ- मुळशीचे उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के यांनी आदेशात नमूद केले आहे.

मावळ तालुक्यातील आतापर्यंत 20 रूग्णांपैकी 15 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कामशेत व टाकवे बुद्रुक येथील दोन नऊ महिन्यांची बालके व कडधे 48 वर्षीय पुरूष व 70 वर्षीय महिला असे  दोन जण तर माऊ येथील 77 वर्षीय महिलेसह तालुक्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या पाच झाली आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी चंद्रकांत लोहारे यांनी दिली.

गेल्या सात दिवसात मावळ तालुक्यात कोरोनाची साखळी तुटली होती पुन्हा सोमवार (दि 8) रोजी कडधे येथील पाॅझिटिव्ह आली होती, पुन्हा मंगळवार व बुधवार साखळी तुटली आणि आज गुरूवारी (दि.11) एकाच दिवशी दोन रूग्ण आढळले.  या परिस्थितीत रूग्ण बरे होण्याचा दर चांगला असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, काळजी घ्यावी असे तालुका आरोग्याधिकारी डाॅ चंद्रकांत लोहारे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.