maval Corona Update : मावळात आज 23 नव्या रुग्णांची भर

एमपीसीन्यूज – मावळ तालुक्यात दिवसेंदिवस रुग्ण संख्या कमी जास्त होत आहे. तालुक्यात बुधवारी (दि.4) 23  रुग्णांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 212 मृत्यू झाले आहेत.

तालुक्यातील कोरोनाबधितांची एकूण संख्या 7493 झाली आहे. तर दिवसभरात 18 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. बुधवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 15 रुग्ण शहरी भागात तर 8 रुग्ण ग्रामीण भागात सापडले.

ग्रामीण भागात कामशेत 4, वराळे, सोमाटणे, कान्हे, सुदवडी प्रत्येकी 1, असे एकूण 8 रुग्ण सापडले. तर शहरी भागात तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत 3,  लोणावळा नगरपरिषद हद्दीत 12 असे 15 रुग्ण सापडले.

वडगाव नगरपंचायत हद्दीत आज एकही रुग्ण सापडला नाही. 111 रुग्ण सक्रिय आहेत. 7170 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मावळ तालुक्यात आज एकही मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 212 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 2180, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1490  व वडगाव नगरपंचायत हद्दीत 514 रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात 4184 रुग्ण तर ग्रामीण भागात 3309  रुग्ण आढळून आले आहेत. एकाही रुग्णाची परिस्थिती गंभीर नाही अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.