Maval Corona Update : मावळात 88 रुग्णांची नोंद ; 130 जणांना डिस्चार्ज, सक्रिय रुग्णांची संख्या 686

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात मंगळवारी (दि.6) 88 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 130 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.आज एकही रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला नसुन आतापर्यंत 238 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. तालुक्यात सक्रिय रुग्णांची संख्या 686 आहे.

आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 28 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 37 रुग्ण व वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 04 रुग्ण सापडले.

सध्या रुग्णालयात 686 रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 10322 झाली आहे. तर दिवसभरात 130 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

मंगळवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये शहरी भागात 69 रुग्ण तर ग्रामीण भागात 19 रुग्ण सापडले. ग्रामीण भागात कामशेत 08, काले 08, भाजे, ब्राम्हनोली, येलघोल प्रत्येकी 01 एकूण 19 रुग्ण सापडले.

आतापर्यंत 9398 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 238 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 3402, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1955 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 656 रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात 6013 रुग्ण तर ग्रामीण भागात 4309 रुग्ण आढळून आले आहेत. एकाही रुग्णांची परिस्थिती गंभीर नाही. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 91.05 टक्के आहे तर मृत्यू दर 2.31 टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत 286, लोणावळा नगरपरिषद मध्ये 160, वडगाव नगरपंचायतमध्ये 35 व ग्रामीण भागात 205 असे एकूण 686 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.