Maval Corona Update : मावळात आज 9 जणांना डिस्चार्ज; फक्त एक पॉझिटिव्ह रुग्ण

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात दिवसेंदिवस रुग्ण संख्या कमी जास्त होत आहे. तालुक्यात मंगळवारी (दि.17) फक्त एका रुग्णाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर दिवसभरात 9 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 212 मृत्यू झाले आहेत.

वडगाव नगरपंचायत व लोणावळा नगरपरिषद हद्दीत आज एकही रुग्ण सापडला नाही. सध्या रुग्णालयात 50 रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 7584 झाली आहे. तर दिवसभरात 09 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मंगळवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 1 रुग्ण शहरी भागात तर ग्रामीण भागात एकही रूग्ण सापडला नाही.

ग्रामीण भागात व शहरी भागात वडगाव नगरपंचायत व लोणावळा नगरपरिषद हद्दीत एकही कोरोना रुग्ण सापडला नाही. तळेगाव नगरपरिषद हद्दीत 1 रुग्ण सापडला 50 रुग्ण सक्रिय आहेत. 7322 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मावळ तालुक्यात आज एकही मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 212 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 2211, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1517 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 518 रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात 4246रुग्ण तर ग्रामीण भागात 3338 रुग्ण आढळून आले आहेत. एकाही रुग्णांची परिस्थिती गंभीर नाही अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहरे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.