Maval Corona Update : मावळातील रुग्ण संख्येत घट; 36 पॉझिटिव्ह, 35 डिस्चार्ज

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात शनिवारी (दि.19) 36 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 35 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

आज शहरी व ग्रामीण भागात रुग्ण संख्या समान झाली आहे. आज एका रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 489 इतकी झाली आहे. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 628 आहे.

शहरी भागात 18 तर ग्रामीण भागात 18 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 10 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषद हद्दीत 05 रुग्ण सापडले. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 03 रुग्ण सापडले.

तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 23,162 झाली आहे. तर दिवसभरात 35 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

शनिवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात बुधवडी 03, कुणे नामा, लोहगड व घोणशेत प्रत्येकी 02, गहूंजे, नवलाख उंब्रे, शिरगाव,साते, थुगाव, मोहितेवाडी, इंगळून, सुदुंबरे व कोंडीवडे नामा प्रत्येकी 01असे एकूण 36 रुग्ण सापडले.

तालुक्यात आतापर्यंत 22,044 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 489 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 7,412, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 3,928 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1191 रुग्ण सापडले आहेत.शहरी भागात 12,53 रुग्ण तर ग्रामीण भागात 10,631 रुग्ण आढळून आले आहेत. 03 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 95.17 टक्के आहे तर मृत्यू दर 2.11 टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 159, लोणावळा नगरपरिषदमध्ये 46, वडगाव नगरपंचायतमध्ये 28 व ग्रामीण भागात 395 असे एकूण 628 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.