Maval Corona Update : मावळमध्ये 83 जणांना डिस्चार्ज, 37 नवे रुग्ण

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात मंगळवारी (दि.13) 37  रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 83 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 499 इतकी आहे. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 620 आहे .

मावळच्या शहरी भागात आज  20 तर ग्रामीण भागात 14 रुग्ण सापडले. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 8 रुग्ण, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 11 तर वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 1 रुग्ण सापडला. तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 24,945 झाली आहे. तर दिवसभरात 83 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

मंगळवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात पवळेवाडी, कामशेत, कुसगाव बुद्रुक, तळेगाव दाभाडे ग्रामीण, कार्ला प्रत्येकी 2, शिरगाव, बेबडओहळ, कांब्रे नामा, चांदखेड, तुंग, मळवंडी ठुले व येलघोल प्रत्येकी 1 असे एकूण 17 रुग्ण सापडले.

तालुक्यात आतापर्यंत 23,826 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 499 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 7,914लोणावळा नगरपरिषद हद्दीत 4,178 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1,259रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात 13,351 रुग्ण तर ग्रामीण भागात 11,594 रुग्ण आढळून आले आहेत. 2 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे.

कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 95.51 टक्के आहे तर मृत्यू दर 2 टक्के आहे. सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषदमध्ये 188 लोणावळा नगरपरिषदमध्ये 102, वडगाव नगरपंचायतमध्ये 11 व ग्रामीण भागात 319 असे एकूण 620  रुग्ण आहेत, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.