Maval Corona Update : मावळात आज 5 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; 33 जणांना डिस्चार्ज

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात दिवसेंदिवस रुग्ण संख्या कमी होत असून मावळात मंगळवारी (दि.27) केवळ 5 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. तर तळेगाव दाभाडे हद्दीत एका रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला. तर दिवसभरात 33 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

तालुक्यातील कोरोनाबधितांची एकूण संख्या 7388 झाली आहे. तर दिवसभरात 33 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मंगळवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 02 रुग्ण शहरी भागात तर 03 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये इंदोरी मध्ये 03 रुग्ण आहेत.

तळेगाव दाभाडे हद्दीत एका रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 209 मृत्यू झाले आहेत.

एमपीसी न्यूज – अंतरंग दसरा विशेषांक वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत 01, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 01 असे एकूण 02 रुग्ण सापडले. वडगाव नगरपंचायत हद्दीत आज एकही रुग्ण सापडला नाही. 253 रुग्ण सक्रिय आहेत. 6926 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मावळ तालुक्यात तळेगाव दाभाडे येथे 70 वर्षीय पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 209 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 2140, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1471 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 508 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात 4119 रुग्ण तर ग्रामीण भागात 3269 रुग्ण आढळून आले आहेत. 02 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.