Maval: मतमोजणीची तयारी पूर्ण; निकालासाठी 29 फे-या

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघाची 23 मे ला मतमोजणी होणार आहे. निवडणूक विभागाची मतमोजणीची तयारी पुर्ण झाली आहे. विधानसभानिहाय 14 टेबलची मांडणी केली असून त्यानुसार सुमारे 25 ते 42 फे-या होणार आहेत. एका फेरीच्या मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय दुसरी फेरी सुरू करू नये, असे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. एक फेरी पूर्ण व्हायला साधारणत: 40 ते 45 मिनिटांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे पहिल्या फेरीचा कल हाती यायला सकाळचे दहा वाजण्याची शक्यता आहे. एकूण मतदानापैकी पाच टक्के ‘व्हीव्हीपॅट’ची मते मोजली जाणार आहेत. त्यामुळे अंतिम निकालाला विलंब होण्याची शक्यता आहे. मतमोजणीच्या 29 फे-या होणार आहेत.

मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे 29 एप्रिल रोजी भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले आहे. मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीन (मतदान यंत्रे) बालेवाडी क्रीडासंकुलातील स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. बालेवाडी क्रीडासंकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये 23 मे रोजी मतमोजणी प्रक्रिया होणार आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी 84 टेबल असणार आहेत. प्रत्येक टेबलवर चार कर्मचारी, रनर, कोतवाल असे सुमारे एक हजार कर्मचारी मतमोजणीसाठी असणार आहेत.

मावळ लोकसभा मतदारसंघात 13 लाख 66 हजार 818 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. चिंचवडमध्ये 2 लाख 83 हजार 4 मतदारांनी, तर पनवेलमध्ये 2 लाख 98 हजार 349 मतदारांनी हक्क बजाविला आहे. 14 टेबलवर मतमोजणी केली जाणार असून चिंचवडसाठी 34, तर पनवेलसाठी 42 फेऱ्या होण्याची शक्यता आहे. एका फेरीला 40 ते 45 मिनिटांचा कालावधी गृहीत धरल्यास मावळ लोकसभेच्या निकाला विलंब होऊ शकतो. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅटची मोजणी करायची आहे.

मतमोजणीसाठी आवश्यक मनुष्यबळासह व्यवस्थेसंदर्भात नियोजन केले आहे. लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी होणार आहे. प्रत्येकी 14 टेबलची व्यवस्था केली आहे. एकाच वेळी 84 मतदान केंद्रांची मतमोजणी झाल्यानंतर फेरीनिहाय निकाल जाहीर होतील. मतमोजणीच्या वेळी संपूर्ण व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी साडेसहाला विविध राजकीय पक्षांचे उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींसमोर स्ट्राँग रूम उघडण्यात येतील. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सकाळी आठला सुरुवात होईल. सुरुवातीला टपाली मतदानाची मोजणी झाल्यानंतर ईव्हीएमच्या मोजणीला सकाळी साडेआठला सुरुवात होईल.

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतमोजणी कक्षाची रचना केली आहे. विधानसभानिहाय 14 टेबलची मांडणी केली असून त्यानुसार सुमारे 25 ते 42 फे-या होणार आहेत. एका फेरीच्या मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय दुसरी फेरी सुरू करू नये, असे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. एक फेरी पूर्ण व्हायला साधारणत: 40 ते 45 मिनिटांचा कालावधी लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.