Maval Crime : जुन्या भांडणातून बाप लेकाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – शेती काम करत असलेल्या मुलाला बेदम मारहाण केली. ती भांडणे मुलाच्या वडिलांनी सोडवली. त्या रागातून तिघांनी वडिलांना देखील बेदम मारहाण (Maval Crime) केली. ही घटना गुरुवारी (दि. 27) दुपारी मावळ तालुक्‍यातील वारंगवाडी येथे घडली.

ज्ञानेश्वर मोरु तुमकर (वय 68, रा. वारंगवाडी, ता. मावळ) यांनी याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रामनाथ धुमाळ, विनोद धुमाळ, बाळासाहेब गोविंद धुमाळ (सर्व रा. वारंगवाडी, ता. मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri : एच ए मैदानातून चरण्यासाठी सोडलेल्या तीन गाई चोरीला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा गुरुवारी (Maval Crime) रोजंदारीवर शेतातील कामे करण्यासाठी घेऊन गेला होता. शेतातील काम संपवून तो बैलगाडीत अवजारे ठेवून घरी येत असताना आरोपी रामनाथ याने त्याला विनाकारण शिवीगाळ करून मारहाण केली. ते भांडण फिर्यादींनी सोडवले. या रागातून तिन्ही आरोपींनी फिर्यादी यांना रस्त्यात अडवून बेदम मारहाण केली. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.