Maval Crime News : रुग्णावर उपचार करण्यासाठी लाच घेणारा पवना हॉस्पिटलमधील डॉक्टर ‘एसीबी’च्या जाळ्यात

महात्मा फुले जन-आरोग्य योजनेंतर्गत मोफत डायलिसिस उपचारासाठी मागितली लाच

एमपीसी न्यूज – शासकीय योजनेंतर्गत मोफत डायलिसिस उपचार सुरू असलेल्या रुग्णावर उपचार करण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांकडून 9 हजारांची लाच घेतल्या प्रकरणी पवना हॉस्पिटलमधील एका डॉक्टरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. त्याच्यासह त्याच्या साथीदाराला देखील पोलिसांनी अटक केली आहे.

डॉ. सत्यजित कृष्णकांत वाढोकर (वय 58), हॉस्पिटलमधील खाजगी मार्केटिंग ऑफिसर प्रमोद वसंत निकम (वय 45) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत 33 वर्षीय व्यक्तीने एसीबीकडे तक्रार दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

तक्रारदार यांच्या वडिलांचे डायलिसिसचे मोफत उपचार महात्मा फुले जन-आरोग्य योजनेंतर्गत आरोपी डॉ. वाढोकर याच्या पवना हॉस्पिटलमध्ये सुरू होते. त्या शासकीय योजनेअंतर्गत औषधोपचार हे पूर्णपणे मोफत आहेत. असे असतानासुद्धा उपचार करण्यासाठी आरोपी डॉ. वाढोकर याने तक्रारदार यांच्याकडे 10 हजारांची लाच मागितली.

तडजोडीअंती 9 हजार रुपये लाच घेण्याचे ठरले. ती लाच डॉ. वाढोकर याने आरोपी खाजगी एजंट प्रमोद निकम याला घेण्यास सांगितले. एसीबीने प्रमोद निकम याला लाच घेताना मंगळवारी (दि. 23) रंगेहाथ पकडले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.