Maval Crime News : पवना नदीतून पाणी उपसा करण्यासाठी शेतकऱ्याकडून 90 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी सहायक अभियंता महिलेस अटक

एमपीसी न्यूज – शेतीसाठी पवना नदीतून पाणी उपसा करण्यासाठी शेतकऱ्याकडून 90 हजारांची लाच घेतल्या प्रकरणी उपसा जलसिंचन विभागाच्या महिला सहायक अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 6) करण्यात आली.

मोनिका रामदास ननावरे (वय 31) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत 56 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे.

आरोपी पंनिका ननावरे उपसा जलसिंचन विभाग पवनानगर येथे सहायक अभियंता वर्ग 2 पदावर काम करतात. तक्रारदार यांची मावळ तालुक्यातील करूंजगाव येथे शेती आहे. त्यांच्या शेतीला पवना नदीतून पाणी उपसा करण्याची परवानगी देण्यासाठी आरोपीे लोकसेवक हिने एक लाख 20 हजारांची लाच मागितली.

तडजोडीअंती 90 हजार रुपये देण्याचे ठरले. दरम्यान तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने सापळा लावून आरोपी महिलेला रंगेहाथ पकडले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक शरद गोर्डे, पोलीस निरीक्षक अलका सरग, पोलीस अंमलदार दिपक टिळेकर, वैभव गोसावी, गणेश भापकर, पूजा पगिरे, दिवेकर यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.