-MPC-TOP-MOST-BANNER-I

Maval Crime News : अखेर पाच महिन्यानंतर बाळासाहेब नेवाळे यांची जामिनावर सुटका

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – गोवित्री विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या मतदार यादी, सभासद यादी व कर्ज वाटपात गंभीर गुन्हा केल्याबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब नेवाळे यांना (दि.22 फेब्रुवारी 2021) अटक करण्यात आली होती.

त्यांनी जामीन मिळण्यासाठी वडगाव व पुणे जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला होता. अखेर पाच महिन्यानंतर गुरुवारी (दि.22) त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. त्यांच्या सुटकेनंतर कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार बाळासाहेब नेवाळे यांच्या गोवित्री विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या मतदार यादी, सभासद यादी व कर्ज वाटण्यात गंभीर गुन्हा केल्याबाबतचा गुन्हा दाखल झाला होता. त्यांची (दि.22 फेब्रुवारी 2021) रोजी येरवडा कारागृहात रवानगी झाली होती.

दरम्यानच्या काळात मावळ न्यायालयाने (दि.25 फेब्रुवारी), (दि.16 मे) व (दि.6 जुलै) तसेच पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने (दि.13 मार्च) जामीन नामंजूर केला होता. (दि.3 एप्रिल) मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेला अर्ज काढून घेण्यात आला.

अखेर मंगळवारी (दि.20) पुणे जिल्हा सत्र न्यायाधीश रोटे यांनी तपास पूर्ण होऊन वैद्यकीय कारणास्तव नेवाळे यांचा जामीन मंजूर केला. गुरुवारी (दि.22) रोजी येरवडा पुणे कारागृहातुन त्यांची सुटका झाली.

नेवाळे यांची 5 महिन्यांनी सुटका झाल्याबद्दल कार्यकर्त्यांनी खंत व्यक्त केली तर नेवाळे सुटल्याचा आनंद ही व्यक्त केला.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn