Maval Crime News : बाळासाहेब नेवाळे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

एमपीसी न्यूज – गोवित्री विविध विकास सेवा सहकारी संस्थेत बनावट मतदार यादी बनवून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळात स्वतः उमेदवार असल्याचा बनावट ठराव मावळ तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात दाखल केल्याप्रकरणी नेवाळे यांच्यावर रविवारी (दि.21) गुन्हा दाखल करण्यात आला होता. नेवाळे यांना सोमवारी (दि.22) अटक केली. मावळ न्यायालयाने गुरुवार (दि.25) पर्यंत पोलीस कोठडी दिली होती.

पोलीस कोठडी संपल्याने गुरुवारी (दि.25) दुपारी 2:30 वा. न्यायालयात हजर केले असता, नेवाळे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. या गुन्ह्यातील उर्वरित दोन आरोपींना कामशेत पोलिसांनी गुरुवार (दि.25) रात्री अटक केली असुन शुक्रवारी (दि.26) न्यायालयात हजर करणार आहे एक आरोपी अद्यापही फरार असून लवकरच अटक करणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम यांनी सांगितले.

बाळासाहेब शंकर नेवाळे वय 49 रा. गोवित्री ता. मावळ न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीचे नाव आहे. प्रकाश महादू गायकवाड वय 45 रा. गोवित्री ता. मावळ व बाळू धाकलू आखाडे वय 38 रा. कोळवाडी ता. मावळ या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी बापू बनाजी धडस हे फरार आहेत.

_MPC_DIR_MPU_II

पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार गोवित्री विविध विकास सेवा सहकारी संस्थेत बनावट मतदार यादी बनवून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळात स्वतः उमेदवार असल्याचा बनावट ठराव मावळ तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात दाखल केल्याप्रकरणी नेवाळे यांच्यावर रविवारी (दि.21) गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नेवाळे यांना सोमवारी (दि.22) अटक केली. मावळ न्यायालयाने गुरुवारी (दि.25) पर्यंत पोलीस कोठडी दिली होती. पोलीस कोठडी संपल्याने गुरुवारी (दि.25) न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्याचा अधिक तपास करण्यासाठी नेवाळे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. नेवाळे यांची येरवडा (पुणे) कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील उर्वरित प्रकाश महादू गायकवाड व बाळू धाकलू आखाडे या दोन आरोपींना कामशेत पोलिसांनी गुरुवारी (दि.25) रात्री अटक केली असुन शुक्रवारी (दि.26) न्यायालयात हजर करणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम यांनी सांगितले.

या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1