Maval Crime News : डिझेल चोरत असल्याच्या संशयावरून पोकलॅण्ड ऑपरेटरला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – पोकलँड मशीनवर ऑपरेटर म्हणून काम करत असताना डिझेल चोरी करत असल्याच्या संशयावरून दोघांनी मिळून पोकलँड मशीन ऑपरेटर आणि त्याच्या तीन मित्रांना बेदम मारहाण केली. की घटना सोमवारी (दि. 17) दुपारी मावळ तालुक्यातील मंगरूळ गावच्या हद्दीत खंडोबा स्टोन क्रशर येथे घडली.

वसीम अनिफ नदाफ (वय 19, रा. मंगरूळ, ता. मावळ), समार पटेल, शिवकुमार गुप्ता, अभिजित कोकाटे अशी मारहाण झालेल्यांची नावे आहेत. याबाबत वसीम याने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रीतम लोंढे, शेखर तोडकर दोघे (रा. मंगरुळ, ता. मावळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वसीम मंगरूळ येथील खंडोबा स्टोन क्रेशरचे मालक विक्रम कलावडे यांच्या पोकलॅण्ड मशीनवर ऑपरेटर म्हणून काम करतात. फिर्यादी वसीम यांनी स्टोन क्रशरचे मालक विक्रम यांचे भाऊ सतीश यांना फोनवरून शिवीगाळ केली या कारणावरून तसेच पोकलॅण्ड मशीन मधील डिझेल चोरतो असे म्हणून फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांना आरोपी सुपरवायझरने शिवीगाळ दमदाटी करत बेल्टने आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली. यात फिर्यादी आणि त्यांचे तीन मित्र जखमी झाले आहेत. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.