_MPC_DIR_MPU_III

Maval Crime News : धक्कादायक ! टाकवेत ग्रामपंचायत सदस्यांच्या नावाने जादूटोणा

सदस्यांची नावे लिहिलेली लिंबे झाडावर ठोकली

एमपीसी न्यूज – सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळमध्ये अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ग्रामपंचायत सदस्यांची नावे लिंबावर लिहून त्यात खिळे मारून लिंबू झाडाला ठोकल्याची घटना सोमवारी (दि. 8) उघडकीस आली आहे.

_MPC_DIR_MPU_IV

अविनाश मारुती असवले यांनी याबाबत वडगाव मावळ पोलिसात तक्रार दिली आहे.

मावळ तालुक्यातील टाकवे गावचे माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अविनाश असवले, अविनाश यांचे चुलते भूषण असवले आणि सहकारी ऋषिनाथ शिंदे यांची नावे लिंबावर लिहून लिंबाला खिळे मारले. ते खिळे मारलेले तीन लिंबू इंद्रायणी नदीतील पिंपळाच्या झाडाला ठोकले.

_MPC_DIR_MPU_II

हा धक्कादायक प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला. अशा प्रकारे लिंबावर नावे लिहून लिंबू झाडावर ठोकल्याने परिसरात खळबळ उडाली.

मंगळवारी (दि. 9) टाकवे गावातील सरपंच आणि उपसरपंच पदाची निवड होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार झाला असल्याचा संशय तक्रारदार अविनाश असवले यांनी व्यक्त केला आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार उघडकीस आल्याने तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.