Maval crime News : सामाजिक सुरक्षा पथकाची जुगार अड्ड्यावर कारवाई; 28 लाख 58 हजारांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने मावळ तालुक्यातील चांदेकर वस्ती, आढले खुर्द येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. त्यामध्ये पोलिसांनी रोख रक्कम, वाहने आणि जुगार साहित्य असा एकूण 28 लाख 58 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सामाजिक सुरक्षा पथकाला गुरुवारी (दि. 22) माहिती मिळाली की, शिरगाव पोलीस चौकीच्या हद्दीत चांदेकर वस्ती, आढले खुर्द येथे तीन पत्ती नावाचा जुगार अड्डा सुरू आहे. त्यानुसार पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकला.

मालक मंगेश खळदे याने लोकांची गर्दी करुन तिन पत्ती जुगार खेळताना व खेळविताना मिळून आला.

एक लाख 42 हजार 320 रुपयांचे तीन पत्ती जुगार खेळण्याचे साहित्य, मोबाईल, दोन लाकडी टेबल, 10 प्लास्टीक खुर्च्या, तीन चारचाकी वाहने असा एकूण 28 लाख 58 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

याबाबत जुगार अड्ड्याचा चालक मालक मंगेश खळदे आणि इतर 10 इसमांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 188, 269, 34, महाराष्ट्र जुगार अधिनीयम 4, 5, साथीचे रोग अधिनीयम 1897 चे कलम 3, राष्ट्रीय आपत्ती अधिनीयम 2005 चे कलम 51 ब, महाराष्ट्र कोव्हीड 19 उपाययोजना 2020 चे कलम 11 प्रमाणे शिरगाव पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त आर आर पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे, सहाय्यक फौजदार विजय कांबळे, पोलीस कर्मचारी सुनिल शिरसाट, नितीन लोंढे, भगवंता मुठे, अनिल महाजन, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, योगेश तिडके, राजेश कोकाटे यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III