Maval Crime News: सोमाटणे फाटा येथे पायी जाणाऱ्या तरुणीची सोनसाखळी हिसकावली

एमपीसी न्यूज – सोमाटणे फाटा येथे पायी जाणाऱ्या तरुणीच्या गळ्यातील सोनसाखळी चोरटयांनी (Maval Crime News) जबरदस्तीने हिसकावून नेली. ही घटना शनिवारी (दि. 24) रात्री साडेनऊ वाजता घडली.

याप्रकरणी 26 वर्षीय तरुणीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी शनिवारी रात्री साडेनऊ वाजता सोमाटणे फाटा येथून परंदवडी रोडने चालत जात होती. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी तिच्या गळ्यातील 30 हजार रुपये किमतीची 12 ग्रॅम वजनाची सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून नेली. तळेगाव दाभाडे पोलीस (Maval Crime News) तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.