Maval : मावळमध्ये गायरान जमिनीवर नेपिअर गवताची लागवड

एमपीसी न्यूज – जनावरांच्या समतोल आहारामध्ये वैरण, हिरवा चारा, आंबवण, खनिज पदार्थ, जीवनसत्त्वे, पाणी यांचा समावेश यासाठी मावळ (Maval) तालुक्यातील आढले बुद्रुक येथे वनराई संस्थेच्या माध्यामातून नेपिअर या चाऱ्याची लागवड करण्यात आली आहे. ग्रामपंचायतमधील सभासदांनी गायरान जमीनीचा विकास करण्याचा निश्चय केला असून, वनराई संस्थेचे शशांक गराडे यांच्या पुढाकारातून हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.

यावेळी आढले ब्रु. चे  सरपंच विश्वास नारायण घोटकुले, उपसरपंच प्रताप गुलाब घोटकुले, सदस्य नितीन नामदेव घोटकुले, जालिंदर वसंत म्हस्के, संगिता हरिभाऊ सावंत, अश्विनी गोरक्षनाथ सपकाळ, सुनिता यशवंत सावळे, सुमन शिवाजी घोटकुले, नितेश दत्तु वाघमारे, नंदिनी आनंद कटके, ग्रामसेवक ए. एम. पाटोळे उपस्थित होते.

Pune Crime : दारू पिण्याच्या वादातून मित्राचा खून, पुण्यातील घटनेने खळबळ

ग्रामस्थांमध्ये जनजागृती करताना गराडे म्हणाले की, जनावरांसाठी लुसलुशीत, पौष्टिक व हिरवा चारा मिळावा, यासाठी संकरित नेपिअर हे बहुवार्षिक गवत महत्त्वाचे ठरत असल्याने याची लागवड (Maval) करणे गरजेचे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.