Maval : वडगावच्या ‘जामा मशिदी’ची जागा ‘क्वारंटाईन सेंटर’साठी देण्याचा निर्णय

बकरी ईद निमित्त आज (शनिवारी) हा निर्णय घेण्यात आला. : Decision to give place of 'Jama Masjid' of Wadgaon for 'Quarantine Center'

एमपीसी न्यूज – वडगावमधील जामा मशिदीची जागा क्वारंटाईन सेंटरसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बकरी ईद निमित्त आज (शनिवारी) हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी स्वागत केले आहे.

जामा मशिदीच्या पदाधिकाऱ्यांकडून   याबाबत ठरावाचे पत्र मावळचे आमदार सुनिल शेळके यांना देण्यात आले आहे.

याप्रसंगी रशीद शेख, आफताब सय्यद, अब्दुल भाई शेख, युनूस भाई मोमीन, सलील तांबोळी, मौलाना मुजीब शेख व राजी इब्राहिम भाई शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. मावळ तालुक्यात देखील मोठया प्रमाणावर रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे.

तसेच संशयित रुग्णांचे प्रमाण वाढत असल्यामुळे या लोकांना क्वारंटाईन करण्यासाठी जामा मशिदीची जागा वापरण्यात यावी, असे या निवेदनात म्हटले आहे.

या मशिदीत अंदाजे 80 ते 100 बेड बसतील एवढी जागा उपलब्ध आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.