BNR-HDR-TOP-Mobile

Maval: लोकसभा मतदारसंघ उमेदवारांचे दैनंदिन लेखे, रोख नोंदवही तपासणी वेळापत्रक जाहीर

0 326
PST-BNR-FTR-ALL
एमपीसी न्यूज – केंद्रीय  निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी ठेवलेल्या दैनंदिन खर्च विषयक लेखे, रोख नोंदवही व बँक नोंदवही याची तपासणी करण्यात येते. मावळ  लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या दैनंदिन लेख्यांचा तपासणी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
15 एप्रिल, 20 एप्रिल आणि 27 एप्रिल रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत  मावळ लोकसभा मतदार संघ, पुणे यांचे कार्यालय, सहावा मजला, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधीकरण, नवीन प्रशासकीय इमारत,आकुर्डी, पुणे येथे निवडणूक खर्च निरीक्षक हे उमेदवारांचे दैनंदिन खर्च विषयक लेखे, रोख नोंदवही व बँक नोंदवहीची तपासणी करणार आहेत, असे निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी कळविले आहे.
HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.