Maval: मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप करा, भाजपची पुणे जिल्हा बँकेकडे मागणी

Maval: Distribute crop loans to farmers in Maval taluka, BJP's demand to Pune District Bank 3 जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेली मदत अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही.

एमपीसी न्यूज- खरीप हंगाम चालू होऊनही मावळ तालुक्यातील गरजू शेतकऱ्यांना अद्याप पीककर्जाचे वाटप झालेले नाही. 3 जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेली मदत अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही.

आघाडी सरकारने जाहीर केलेली दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी आणि नियमित कर्जफेड करणारे शेतकरी यांना जाहीर केलेले 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान याबाबत प्रत्यक्षात दिलेल्या मदतीची खरी माहिती प्रसिद्ध करावी व पात्र शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी या व इतर मागण्यांचे निवेदन मावळ तालुका भाजपच्या वतीने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्ला शाखाधिकारी यांना देण्यात आले.

यावेळी भाजपचे प्रदेश सचिव जितेंद्र बोत्रे, माजी उपसरपंच प्रदीप हुलावळे, मावळ युवा मोर्चा कार्याध्यक्ष अर्जुन पाठारे, प्रसिद्धी प्रमुख सागर शिंदे, उपाध्यक्ष मच्छिंद्र केदारी, भाजप नाणे मावळ अध्यक्ष अमोल केदारी, भाजप उपाध्यक्ष अमोल भेगडे, कुसगाव गण अध्यक्ष शेखर दळवी, चिटणीस नवनाथ कडू, माजी सरपंच दत्तात्रय पडवळ, एकनाथ गायकवाड, संतोष तिकोने हे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.