_MPC_DIR_MPU_III

Maval : आमदार सुनील शेळके आणि मावळ ‘राष्ट्रवादी’च्या वतीने उद्यापासून मावळकरांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

एमपीसी न्यूज – मावळ विधानसभा मतदारसंघातील सर्व गरजू कुटुंबांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनील शेळके आणि मावळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या माध्यमातून सोमवार (दि 6 एप्रिल)पासून जीवनावश्यक कीटचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी दिली.

_MPC_DIR_MPU_IV

आपल्या देशावर आलेल्या कोरोना रोगरूपी संकटाला सामोरे जाताना, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सद्य परिस्थित सर्व उद्योग धंदे, आस्थापना, रोजगार निर्मितीची साधने व व्यवसाय बंद असल्यामुळे आपल्या मावळ तालुक्यातील मोलमजुरी करणारे आपले नागरीक व त्यांच्या कुटुंबांची उपासमारी होऊ नये. तसेच मावळातील गोरगरिब बांधवांसाठी आपण सर्व मावळवासी मिळून त्यांच्यासाठी जीवनावश्यक वस्तूंचे कीट खालीलप्रमाणे केलेले आहेत.

त्यामध्ये 10 कि. आटा, साखर 2 किलो, चहापावडर 250 ग्रॅम, तेल 2 किलो, तांदूळ 5 किलो, हरभरा डाळ, तूरडाळ, मसूरडाळ, उडीद डाळ प्रत्येकी 1 किलो, मसाला 250 ग्रॅम, बेसनपीठ 1 किलो, मीठ 500 ग्रॅम, डेटाॅल साबण 2 नग एवढं साहित्य कीटमध्ये आहे.

_MPC_DIR_MPU_II

अत्यंत अडचणीच्या प्रसंगी सर्व स्वयंसेवी संस्था, सर्व सार्वजनिक मंडळे, व्यापारी वर्ग, तसेच दानशुर व्यक्तीकडून एक हात मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

त्याचबरोबर या सामाजिक कार्यात मावळमधील बांधवांना कीट देऊन हातभार लावायचा असेल त्यांनी शहरीभाग- तळेगाव दाभाडे नगरपरिषद, लोणावळा नगरपरिषद, वडगाव नगरपंचायत आणि देहूरोड कॅन्टोन्मेट बोर्ड या ठीकाणी कीट जमा करावेत.ग्रामीण भाग-प्रत्येक गावातील तलाठी कार्यालय, प्रमाणे मदतीचा एकसूत्रीपणा निर्माण होईल आणि वंचित घटकांपर्यंत आपली मदत पोहोचेल.

याप्रसंगी बबनराव भेगडे, बापूसाहेब भेगडे, गणेश खांडगे, बाबुराव वायकर, सचिन घोटकुले, गणेश काकडे, सुभाष जाधव, दीपक हुलावळे, कैलास गायकवाड, सुनील दाभाडे, सुनील भोंगाडे, सुवर्णा राऊत, संतोष मु-हे, जीवन गायकवाड, अॅड कृष्णा दाभोळे, राजेंद्र कुडे, गजानन शिंदे, नवनाथ चोपडे, अतुल राऊत, नामदेव शेलार, अफताब सय्यद, विकी लोखंडे, संजय शेंडगे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.