Maval : गरजू कुटुंबांना मुस्लिम जमाअत इंदोरी आणि स्टार ग्रुपच्या वतीने अन्नधान्य वाटप

एमपीसी न्यूज – इंदोरी गावातील अनेक भागात गोरगरीब कुटुंबात राहत असलेल्या 30 कुटुंबांना 21 दिवस पुरेल इतके अन्नधान्य मुस्लिम जमाअत इंदोरी व स्टार ग्रुपच्या वतीने देण्यात आले. एक पाऊल माणुसकीच्या सेवेसाठी टाकत हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूविरुद्ध आपणही युद्ध पुकारले आहे. हे 21 दिवस संयम आणि संकल्पाचे असणार आहेत. मात्र त्याचवेळी समाजातील वंचित घटकांसाठी हा काळ परीक्षेचाही असणार आहे. अशा घटकांना यथाशक्ती मदत करण्याचा एक प्रयत्न मुस्लिम जमाअत इंदोरी व स्टार ग्रुपने केला आहे.

परिसरातील ज्यांचे हातावरचे पोट आहे, अशा व्यक्तींना पुढील वीस दिवस पुरेल एवढे निवडक धान्य व जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. सिराज मुलानी, मगबुल मुलानी, रियाज तांबोळी, नईम मुलानी, आयुब मुलानी, मुन्नावर इनामदार,तौसिफ मुलानी,जावेद सय्यद, सलमान इनामदार, आबिद सय्यद, मदनी मुलानी,अबुजर सय्यद,रियाज मुलानी, अब्रार मुलानी, रियाज इनामदार आदींनी यासाठी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.