Maval : दिवड ग्रामपंचायतीच्या 84 लाखांच्या पाणीयोजनेचा शुभारंभ

मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

एमपीसी न्यूज – दिवड गावच्या अंतर्गत पाणी योजनेच्या मागणीचा प्रश्न तडीस लावण्यात मावळचे आमदार सुनिल शेळके यांना यश आले आहे. दिवड गावच्या नळ पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ आज, मंगळवारी (दि. 3) आमदार शेळके यांचे बंधू, उद्योजक सुधाकर शेळके यांच्या उपस्थितीत व विद्यमान सरपंच पार्वतीबाई सावळे यांच्या हस्ते करण्यात आले. या योजनेसाठी 84 लाख रुपयांचा खर्च येणार आहे.

आमदार शेळके यांच्या माध्यमातून व जलजीवन मिशन अंतर्गत गुलाबराव पाटील, पाणीपुरवठा मंत्री व राज्यमंत्री संजय बनसोड यांनी मावळ तालुक्यातील टंचाई क्षेत्रातील गावांच्या पाणीयोजनांना अंतिम मंजुरी देऊन त्यासाठी तात्काळ निधी उपलब्ध करुन दिला. फेब्रुवारी महिन्यात त्या सर्व योजनांच्या कामाच्या ऑर्डर प्रसिध्द करण्यात आल्या होत्या. त्यातील दिवड गावातील योजनेचा शुभारंभ झाला.

यावेळी ग्रामसेविका माधुरी झेंडे, सरपंच लहुजी सावळे, नामदेव सावळे, उपसरपंच प्रकाश राजिवडे, दत्ताभाऊ सावळे, भगवान सुर्वे, रमेश राजिवडे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप सावळे, रोहिदास सावळे, गणेश गाडे, रंजना पवार, जालिंदर सावळे, ज्ञानेश्वर सावळे, लक्ष्मण सावळे, नरहरी सावळे, आनंदा सावळे, सोनाबाई तुपे, नुतन सावळे, कमळ लोहेकर, सुमन सावळे, सोमाजी लोखरे यांच्यासह दिवड ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गावातील मारुती मंदिराच्या प्रांगणात ग्रामस्थांच्या वतीने सुधाकर शेळके व इतर मान्यवरांचा सत्कार झाला. सत्काराला उत्तर देताना गावातील इतर समस्यांचा आढावा घेत शेळके यांनी प्राधान्य क्रमाने गावात पाण्याचा प्रश्न असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्रादेशिक पाणी योजनेचे पुनर्गठन करुन त्यासाठी अंतिम प्रशासकिय मंजुरी व अंदाजे 5 कोटी रुपयेचा निधी उपलब्ध करुन येत्या 6 महिन्यात काम प्रत्यक्षात चालू करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही दिली व विकासकामात कोणत्याही प्रकारे पक्षीय राजकारण न करता गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रित येऊन गाव 100 टक्के विकसनशील करावे अशी विनंती केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तंटामुक्ती अध्यक्ष निवृत्ती गायकवाड, यांनी केले व आभार अमोल सावळे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.