Maval : पवना धरण 24 टक्के भरले; पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस

एमपीसी न्यूज – गेल्या 24 तासांत पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणारे पवना धरण जवळजवळ 24 टक्के भरले आहे.

पावसाळा उशिरा सुरू झाल्याने पवना धरणाचा पाणीसाठा 13 टक्क्यांपर्यंत खाली गेला होता. मात्र पाऊस सुरू झाल्याने दररोज पाणीसाठ्यात भर पडू लागली आहे. गेल्या 24 तासांत धरणक्षेत्रात 120 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे पाण्यासाठ्यात 2.91 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या धरणात 23.90 टक्के (2.03 टीएमसी) पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी आजच्या तारखेला धरण 31.92 टक्के भरले होते.

  • पवना धरण क्षेत्रात या पावसाळ्यात एकूण 677 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी या तारखेपर्यंत 729 मिलीमीटर पाऊस पडला होता. यंदा उशिरा पाऊस सुरू होऊन देखील तो मागच्या वर्षीच्या आकडेवारीच्या जवळपास पोचत आला आहे. या पावसाळ्यात पाणीसाठ्यात 10.44 टक्के वाढ झाली असून त्यापैकी 2.91 टक्के म्हणजेच सुमारे तीन टक्के वाढ कालच्या एका दिवसात झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.