Maval : प्रचारादरम्यान पार्थ पवार यांच्या माणुसकीचे दर्शन 

एमपीसी न्यूज- राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांनी आज उरण परिसरात झंझावाती दौरा केला. मात्र हा दौरा करत असतानाच न्हावे गावात जात असताना रस्त्यात  ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला होता. मात्र त्या गंभीर जखमी तरुणाला कोणतीच मदत रस्त्यावर उपलब्ध होत नव्हती. 
पार्थ पवार यांचा ताफा न्हावे गावात जात होता. अपघातग्रस्त तरुण दिसताच पार्थ पवार यांनी आपला ताफा थांबवला. जखमी तरुणाच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याचे लक्षात येताच त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. तात्काळ गाडी उपलब्ध करून देत त्यांनी गंभीर जखमी तरुणाला वैद्यकीय मदत मिळवून दिली.
  • ट्रक चालकाला स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. नियोजित कार्यक्रमाला महत्व न देता पार्थ पवार यांनी माणुसकीचे दर्शन यानिमित्ताने घडवले. त्यामुळे परिसरात पार्थ पवार यांच्या माणुसकीचे कौतुक होत आहेत.

प्रचार आणि गाठीभेटी या होतच राहतील मात्र गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे प्राण वाचवणे हीच माणुसकी असल्याची चर्चा परिसरात होत आहे. निवडणूक होईपर्यंत प्रत्येक क्षण महत्वाचा असतो. मात्र लोकप्रतिनिधीच्या माणुसकीचे दर्शन अशाच काही प्रसंगातून घडत असते. भर उन्हात तडफडत असलेल्या गंभीर तरुणाला मदतीचा हात देऊन सर्वच तरुणांसमोर पार्थ पवार यांनी आदर्श निर्माण केला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.