BNR-HDR-TOP-Mobile

Maval : लोकसभा मतदारसंघात आज ठाकरे बंधुंच्या धडाडणार तोफा

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या आज (गुरुवारी) तोफा धडाडणार आहेत. उद्धव यांची सायंकाळी सात वाजता काळेवाडीत तर राज यांची घाटाखाली पनवेलमध्ये सायंकाळी सात वाजता जाहीर सभा होणार आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघ पुणे आणि रायगड जिल्ह्यात विभागला आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड आणि मावळ तर रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल, कर्जत असे सहा विधानसभा मतदारसंघाचा मावळ लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली आहे. मावळातील उमेदवारांची प्रचार करताना दमछाक होते.

मावळ लोकसभा मतदारसंघाचे भाजप, शिवसेना, रिपाइं (ए), राष्ट्रीय समाज पार्टी, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज (गुरुवारी) सायंकाळी सात वाजता सभा होणार आहे. त्याचवेळी घाटाखाली पनवेलमध्ये भाजप-शिवसेना, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होणार आहे.

दरम्यान, मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे पवार कुटुबियांची प्रतिष्ठा पणाला लागले आहे. पार्थ यांना शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांचे आव्हान आहे. या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

HB_POST_END_FTR-A4

.