Maval: उद्योजक राहुल बजाज यांनी आकुर्डीत बजाविला मतदानाचा हक्क 

एमपीसी न्यूज – ज्येष्ठ उद्योजक राहुल बजाज यांनी कुटुंबियांसह आपला मतदानाचा हक्क बजाविला आहे. आकुर्डीतील गोदावरी हिंदी विद्यालयात आज (सोमवारी) दुपारी सव्वादोनच्या सुमारास बजाज यांनी मतदान केले. 
मावळ मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत असून मतदान केंद्राबाहेर रांगा लागल्या आहेत. नवमतदारांसह ज्येष्ठ मतदारांमध्ये लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी उत्साह दिसून येत आहे. अभिनेते, अभिनेत्री यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजाविला आहे. ज्येष्ठ उद्योजक राहुल बजाज यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजाविला आहे. आकुर्डीतील गोदावरी हिंदी विद्यालयात आज दुपारी सव्वादोनच्या सुमारास बजाज यांनी मतदान केले.

  • राहुल बजाज हे गेल्या अनेक वर्षांपासून आकुर्डी येथे बजाज ऑटो कंपनीच्या आवारात असलेल्या बंगल्यात राहतात. मागील प्रत्येक निवडणुकीसाठी ते स्वतः आणि त्यांचे सर्व कुटुंबीय आकुर्डीमधील गोदावरी हिंदी विद्यालयात मतदानाचे कर्तव्य पार पाडतात.

दरम्यान, मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघात मतदानाला मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मावळमध्ये दुपारी एक वाजेपर्यंत 31.85 टक्के तर शिरुर लोकसभा मतदारसंघामध्ये 30.40 टक्के मतदान झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.