Maval : दरवर्षीप्रमाणे यंदाही मावळ फेस्टिव्हल 27 डिसेंबर रोजी 

एमपीसी न्यूज – दरवर्षीप्रमाणे यंदाही 27 डिसेंबर रोजी मावळ फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त मान्यवरांच्या श्री.पोटोबा देवस्थान संस्थानचे विश्वस्त आणि वडगांव बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड.तुकारामजी काटे यांचे हस्ते मंच पूजन करण्यात आले. यावेळी बोलतांना काटे यांनी मावळ फेस्टीवल या सलग 12 वर्ष यशवीरित्या झाली असून या उपक्रमाचे कौतुक करून फेस्टिव्हलला शुभेच्छा दिल्या.

कला, क्रीडा आणि संस्कृतीचा खजिना म्हणून या मावळ फेस्टिव्हलकडे पाहिले जात आहे. यंदा मावळ फेस्टिव्हलचे हे 12वे वर्षे आहे.

यावेळी नगरसेवक मावळ फेस्टीवलचे संस्थापक, नगरसेवक प्रविण चव्हाण, मावळ फेस्टीवलचे अध्यक्ष सागर जाधव, मावळ फेस्टीवलचे कार्यक्रम प्रमुख महेंद्र बा. म्हाळसकर आणि सर्व संचालक मंडळ आदी मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.