Maval: एक्स्प्रेस वेवर स्थानिकांकडून टोल वसुली नको, राष्ट्रवादीची मागणी

Maval: Expressway should not collect toll from locals, NCP demands स्थानिकांना प्रवास करण्यासाठी इतर कोणत्याही सोयीचा पर्याय रस्ता किंवा सेवा रस्ता उपलब्ध नसल्याने या महामार्गावरून सतत प्रवास करावा लागतो.

एमपीसी न्यूज- मावळ तालुक्यातील पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग व जुना मुंबई-पुणे महामार्ग गेलेले असून त्यावर पथकर नाके आहेत. त्यामुळे तालुक्यातील स्थानिक शेतकरी, कामगार, व्यापारी वर्गांना कामानिमित्त टोलनाक्यावरून ये-जा करावी लागते. त्यामुळे स्थानिकांकडून टोल वसुली करु नये अशा मागणीचे निवेदन मावळ राष्ट्रवादी काँग्रेसने आयआरबीला दिले.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, स्थानिकांना प्रवास करण्यासाठी इतर कोणत्याही सोयीचा पर्यायी रस्ता किंवा सेवा रस्ता उपलब्ध नसल्याने या महामार्गावरून सतत प्रवास करावा लागतो.

सद्यस्थितीत या टोलनाक्यावरून स्थानिकांकडून टोल वसुली केली जाते. यापूर्वी टोलनाका सुरू झाल्यापासून आजतागायत स्थानिकाकडून पथकर आकारण्यात येत नव्हता.

दोन्ही महामार्ग सेवा रस्ते उपलब्ध होईपर्यंत मावळ तालुक्यातील स्थानिक नागरिकांकडून कोणत्याही प्रकारचा टोल आकरण्यात येऊ नये, अशा मागणीचे निवेदन आयआरबीचे सरव्यवस्थापक वामन राठोड यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मावळ यांच्यावतीने देण्यात आले आहे.

यावेळी तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे, पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष सचिन घोटकुले, युवराज केदारी,अविनाश कारके, अजित चौधरी आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.