Maval : कान्हे-साते परिसरातील 103 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ

एमपीसी न्यूज – कान्हे, साते, मोहितेवाडी, ब्राह्मणवाडी, विनोदेवाडी, जांभूळ येथील 103 शेतकऱ्यांना महात्मा जोतीराव फुले कर्ज मुक्ती योजना 2019 अंतर्गत कर्ज माफी जाहीर झाली आहे. त्या निमित्त आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते लाभार्थी शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण नोंद पावती प्रदान करण्यात आली.

 

मंदा रमेश गाडे, ताईबाई जालिंदर सोरटे, देवराम सखाराम गाडे या लाभार्थी शेतकऱ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात  आधार प्रमाणीकरण नोंद पावत्या देण्यात आल्या. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी बँक) कान्हे फाटा शाखेत हा कार्यक्रम झाला. या वेळी उर्मिला सं. जांभूळकर, बाळासाहेब के. काकरे, गणपत भानुसघरे, दशरथ सातकर, महादु सातकर, संजय शिंदे, लक्ष्मण आगळमे, रमेश गाडे, एकनाथ येवले, दत्ता निम्हण, पैलवान चंद्रकांत सातकर, नंदाताई दे. सातकर, बंडोबा सातकर तसेच या भागातील शेतकरी  उपस्थित होते.

 

महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम हे सरकार करत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेऊन सरकारने या कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम केलेलं आहे. महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून अनेक शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र ठरले आहेत. शेतकऱ्यांचे आधार कार्ड लिंक करण्यात आलेले आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफी योजनेतील रक्कम जमा होणार आहे.  कसल्याही प्रकारची शेतकऱ्यांची गैरसोय होता कामा नये हा सरकारचा आहे, असे यावेळी बोलताना आमदार शेळके यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.