Maval: 19 फेब्रुवारी हा शिवजयंतीचा दिवस ‘दुर्ग दिन’ म्हणून साजरा व्हावा; गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेची पंतप्रधानांकडे मागणी

Maval: February 19 should be celebrated as 'Durg Din'; Demand of Gadbhatkanti fort conservation organization to the Prime Minister छत्रपती शिवाजी महाराजाच्या जयंती दिवशी अनेक शिवभक्त गड किल्यांवर जात असतात. त्या दिवशी महाराजांच्या पराक्रम व शौर्याच्या आठवणींना उजाळा दिला जातो.

एमपीसी न्यूज- छत्रपती शिवाजी महाराजांच्या सामर्थ्य आणि पराक्रमाची आठवण करून देत उभे असलेले गड, किल्ले हीच महाराष्ट्राची खरी संपत्ती आहे. या ऐतिहासिक ठेव्याचे जतन व्हावे, इतिहासाची जाण व्हावी तसेच लोकांना दुर्गसंवर्धनाचे महत्व पटावे यासाठी शिवजयंतीचा (19 फेब्रुवारी) हा दिवस ‘दुर्ग दिन’ म्हणुन साजरा व्हावा अशी मागणी वडगाव मावळ येथील गडभटकंती दुर्गसंवर्धन या संस्थेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजाच्या जयंती दिवशी अनेक शिवभक्त गड किल्यांवर जात असतात. त्या दिवशी महाराजांच्या पराक्रम व शौर्याच्या आठवणींना उजाळा दिला जातो.

महाराजांचे खरे वैभव असणारे हे गड किल्यांची महती आणि संवर्धन यांची सर्वांना माहिती व्हावी यासाठी 19 फेब्रुवारी शिवजयंतीचा दिवस दुर्ग दिन म्हणून साजरा करायला हवा.

नागरिकांना देशातील ऐतिहासिक गड किल्यांचे महत्व कळावे तसेच त्यांच्याबद्दल जाण आणि आदर वाढावा हा खरा उद्देश आहे.

देशाला परकीय आक्रमणापासून दूर लोटणाऱ्या पूर्वजांच्या इतिहासाबद्दल आणि गड किल्यांच्या संवर्धनाबाबत जनजागृती व्हावी म्हणून दुर्ग दिन साजरा करायला हवा असे मत गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेचे पदाधिकारी किरण चिमटे यांनी व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.