BNR-HDR-TOP-Mobile

Maval: खासदार श्रीरंग बारणे यांचा लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते रोपटे भेट देऊन सत्कार

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतील विजयानंतर शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (बुधवारी) मोरवाडी येथील भाजपच्या शहर कार्यालयाला भेट दिली. भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी खासदार बारणे यांना जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रोपटे भेट देऊन त्यांचे स्वागत केले.

खासदार अमर साबळे, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, पक्षाच्या प्रदेश सदस्य उमा खापरे, महेश कुलकर्णी, राजेश पिल्ले, अमित गोरखे, शहर सरचिटणीस अमोल थोरात, संजय मंगोडेकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे आदी उपस्थित होते.

  • आमदार जगताप यांच्या हस्ते एक रोप देऊन खासदार बारणे यांचा सत्कार करण्यात आला.सत्कारानंतर बोलताना आमदार जगताप यांनी खासदार बारणे यांचे दुसऱ्यांदा खासदार झाल्याबद्दल अभिनंदन केले. लोकसभा निवडणुकीत बारणे यांचा झालेला विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा झालेला विजय असल्याचे सांगितले. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने एकदिलाने काम केले. त्याचा परिणाम म्हणजे मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना खासदार बारणे यांचा मोठ्या फरकाने विजय झाला. केंद्र सरकारशी निगडीत असलेले पिंपरी-चिंचवडमधील प्रलंबित प्रत्येक प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी खासदार बारणे यांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी आमदार जगताप यांनी केली.

सत्काराला उत्तर देताना खासदार बारणे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने माझे मनापासून काम केल्याचे सांगितले. भाजप कार्यकर्त्यांनी घेतलेल्या अपार कष्टामुळे मावळ लोकसभा मतदारसंघात माझा मोठ्या फरकाने विजय झाला. आता भाजपला मदत करण्याची माझी वेळ आहे. यापुढील विधानसभा, महापालिका निवडणुका युती म्हणून एकत्र लढताना भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आपण मदत आणि ताकद देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

  • कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजप शहर सरचिटणीस अमोल थोरात यांनी केले.
HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3