Maval: वडगाव मावळ येथील दुर्ग संवर्धन संस्थेने केली ‘पवना धरण परिक्रमा’ 

Maval: Fort Conservation Society at Wadgaon Maval conducted 'Pavana Dam Parikrama' दोन दिवसांत ५६ कि मी अंतर केले पूर्ण  

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथील गड भटकंती दुर्गसंवर्धन संस्थेच्या वतीने 13 व 14 तारखेला 56 किमीची पवना धरण परिक्रमा पूर्ण केली आहे 1972 साली बांधून झालेल्या पवना धरणाची परिक्रमा पहिल्यांदाच पूर्ण केली असून या संस्थेला दोन दिवस लागले. तसा पवना धरणाचा व्यास हा 79 किलोमीटरचा आहे परंतु पाणी कमी झाले असल्याने 56 किमी अंतर भरले आहे.
वडगाव मावळ गड भटकंती दुर्गसंवर्धन संस्था गेले तीन वर्षापासून पवन मावळ येथील तिकोना किल्ल्याचे दुर्ग संवर्धन करत असून त्यांनी  किल्ल्यावर विविध कामे केली आहेत.
भटकंतीच्या सदस्यांनी शनिवारी 13 तारखेला सायंकाळी 4 वाजता पवना धरणाच्या मुख्य भिंती लगत असलेल्या ब्राम्हणोली गावापासून परिक्रमेला सुरवात केली ब्राम्हणोली, ठाकूरसाई, वाघेश्वर, चावसर, तुंग या गावांच्या कडेने धरणातून प्रवास केला व कोळे या गावात रात्री 10 वाजता पोहचून तेथे मुक्काम केला पहिल्या दिवशी 20 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला.
यावेळी नऊ महीने धरणाच्या पाण्यात बुडून असणारे व  तीन महिने पाण्याच्या बाहेर असणाऱ्या वाघेश्वर मंदिराचे दर्शन घडले. तसेच वाघेश्वर गावातील मंदिरात 1933 ते 1939 साली वसईच्या मोहिमेतील सर्वात मोठी मंदिरातील घंटा आहे ती पाहण्यास मिळाली .
दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता पुन्हा परिक्रमेला सुरवात करून चाफेसर, केवरेवाडी, आपटी, गेवंढे, पाले, शिंदगाव, आंबेगाव, काळेकॉलनी, ब्राम्हणोली असा दुसऱ्या दिवशी 36 किलोमीटरचा प्रवास सायंकाळी सहा वाजता पूर्ण केला.
या प्रदक्षिणेत गड भटकंती दुर्ग संवर्धनचे अ‍ॅड. मारुती आबा गोळे, श्रीनिवास कुलकर्णी, सचिन ढोरे, गणेश जाधव, अ‍ॅड. अजित वहिले, अ‍ॅड. रवी विनोदे, हनुमंत जांभुळकर, विशाल शिंदे, अंकेश  ढोरे, सचिन इंगळे, सागर थरकुडे, प्रशांत सालकर, संतोष कडू, कुमार ओंकार कडू असे 14 जण  सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.