Maval : निगडे येथील तलाठी कार्यालयाच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील निगडे येथील तलाठी ( Maval ) कार्यालयाची नवीन इमारत बांधली जाणार आहे. या कामासाठी 20 लाख 35 हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या इमारतीच्या कामाचा भूमिपूजन समारंभ मंगळवारी (दि.30) संपन्न झाला. तलाठी कार्यालयाचे कामकाज अपुऱ्या जागेमध्ये होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. नवीन इमारत झाल्यास निगडे पंचक्रोशीतील ग्रामस्थांची सोय होणार आहे.

या भूमिपूजन समारंभ प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक बंडू घोजगे, निगडे उपसरपंच गणेश भांगरे,आंबळे सरपंच मोहन घोलप, माजी सरपंच बळीराम भोईरकर, विठ्ठल जाधव,देविदास भांगरे, सविता भांगरे, तलाठी जाधव, संजय गांधी समिती अध्यक्ष नारायण ठाकर, बाबाजी गायकवाड, दत्तात्रय पडवळ, चेअरमन संतोष करवंदे, माणिक तांबोळी, बाबाजी येवले, योगेश थरकुडे,सोपान ठाकर, सीताराम ठाकर,घमादादा ठाकर आदी उपस्थित होते.

Pimpri : फेरीवाल्या आईच्या मुलाने सर केले एव्हरेस्ट शिखर

ग्रामीण भागातील शेतकरी व सर्वसामान्यांची कामे ही तलाठी कार्यालयाशी संबंधित असतात. तलाठी हा शासन व शेतकरी यांच्यामधील दुवा असतो.शेतजमिनी संबंधित अभिलेख अद्ययावत रहावेत.तसेच विविध नोंदणी,दाखले यासाठी नागरिकांना नेहमीच तलाठी कार्यालयाची आवश्यकता भासते. तलाठी कार्यालयाचे कामकाज अपुऱ्या जागेमध्ये करावे लागत होते.

त्यामुळे निगडे,कल्हाट,कशाळ,भोयरे, पवळेवाडी येथील ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.निगडे गावात मध्यवर्ती ठिकाणी स्थायिक स्वरुपात सुसज्ज कार्यालय झाल्यानंतर सामान्य नागरिकांसह कर्मचारी वर्गाचेही कामकाज सोयीस्कर होण्यास नक्कीच मदत ( Maval ) होणार आहे.

“शेतकऱ्यांची व ग्रामस्थांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन तलाठी कार्यालय स्वतंत्र असणे गरजेचे होते. हीच गरज ओळखून आमदार सुनिल शेळके यांनी निधी उपलब्ध केला.या कार्यालयामुळे नागरिकांसाठी तलाठी देखील वेळेवर उपलब्ध होतील.”

– भिकाजी भागवत सरपंच निगडे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.