Maval : नाणे  व आंदर मावळातील  नागरिकांचे मोफत थर्मल टेस्टिंग

एमपीसी न्यूज –  कोरोना  साथीच्या पार्श्‍वभूमीवर विविध ठिकाणी खबरदारी म्हणून उपाय योजना करण्यात येत आहेत.  काही ठिकाणी सॅनिटायजेशन व मास्क वाटपसारखे उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचप्रमाणे पै.  देवाभाऊ मित्र मंडळ परिवार यांच्यावतीने नाणे मावळ व आंदर मावळ येथील नागरिकांचे मोफत थर्मल टेस्टिंग केले जात आहे.

 

यामध्ये टेंपरेचर टेस्टिंग गणच्या मदतीने नागरिकांच्या शरीराचे तापमान तपासले जात आहे. आत्तापर्यंत नाणे मावळ व आंदर मावळ भागातील जवळपास दोन हजार नागरिकांचे या गणच्या सहाय्याने टेस्टिंग करण्यात आले आहे. या तपासणीमुळे नागरिकांच्या मनातील भीती दूर होण्यास मदत होत असल्याचे आयोजकांचे मत आहे. तसेच येत्या काही दिवसात वीस हजार नागरिकांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.