Maval : जिल्हा नियोजन मंडळातून तालुक्यातील विकासकामांना 47 कोटींचा निधी

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील (Maval) विविध विकासकामांसाठी पुणे जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून 47 कोटी 60 लाख 39 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी सुचविलेल्या कामांना देखील 100 टक्के निधी मंजूर केला असून भाजपकडून कुठलेली भेदभावाचे राजकारण केले जात नाही. तालुक्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून आपण प्रयत्नशील असल्याची माहिती माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी दिली.

माजी मंत्री बाळा भेगडे यांनी पुणे जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टी व बाळासाहेबांची शिवसेना यांना एकत्र घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत निधीची मागणी केली होती. जिल्हा पुणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये 47 कोटी 60 लक्ष 39 हजार रुपये मंजूर झालेले आहेत. या पुढील काळात भारतीय जनता पार्टी व बाळासाहेबांची शिवसेना सरकारच्या माध्यमातून मावळ तालुक्याला कोटी रुपयांचा निधी यापुढील काळात मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, अशी माहिती माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी दिली.

Talegaon Dabhade : मोफत नेत्ररोग तपासणी, शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्याला निधीची तरतूद (Maval) करत असताना मावळ तालुक्यातील विद्यमान आमदारांनी सुचविलेल्या मागील काळातील विकासकामांना देखील कोणतीही स्थगिती न देता 100% निधी देण्याचे काम केले असून यापुढेही कोणतेही राजकारण न करता तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध असू, असे बाळा भेगडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.