Maval : किल्ले बनवा स्पर्धेत गौरव वाघमारे प्रथम

शिवशाही मित्र मंडळाच्या किल्ले बनवा स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न 

एमपीसी न्यूज – टाकवे बुद्रुक येथील शिवशाही मित्र मंडळाद्वारे दरवर्षी किल्ले ( Maval ) बनविण्याची स्पर्धा घेतली जाते. शिवकाळ आणि शिवस्मृती आजच्या पिढीत जिवंत राहाव्यात. मुलांना आपल्या गौरवपूर्ण इतिहासाचे स्मरण राहावे व त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी या स्पर्धा घेतल्या जातात. सालाबाद प्रमाणे यावर्षी घेण्यात आलेल्या किल्ले बनवा स्पर्धेला मुलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत गौरव वाघमारे यांने प्रथम क्रमांक पटकाविला. तर सार्थक लंके याला द्वितीय स्थान मिळाले.

या पारितोषिक वितरण समारंभाला मंडळाचे संस्थापक, टाकवे गावचे माजी उपसरपंच स्वामी जगताप, व्यापारी असोसिएशन अध्यक्ष योगेश मोढवे, टाकवे विविध कार्यकारी सोसायटीचे माजी संचालक दिलीप आंबेकर, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य नवनाथ आंबेकर, मंडळाचे अध्यक्ष प्रदीप मोढवे, उपाध्यक्ष रोहीदास खुरसुले, सचिव बाबाजी असवले, सोसायटीचे माजी चेअरमन विकास असवले, चंद्रकांत तळपे, संभाजी धामणकर, विष्णू लोंढे, टाकवे नाभिक संघटना अध्यक्ष पवन क्षीरसागर, महेंद्र असवले आदी मान्यवर( Maval ) उपस्थित होते.

SSC Exam : दहावीच्या परीक्षांचे फॉर्म भरण्यासाठी दहा दिवसांची मुदतवाढ

पारितोषिक वितरण समारंभ शिवशाही मित्र मंडळाच्या प्रांगणात संपन्न झाला. त्यावेळी मंडळाचे संस्थापक स्वामी जगताप म्हणाले, वाढते औद्योगिकीकरण, नागरीकरण आणि सिमेंटच्या जंगलात मुलांची मातीशी ओळख व्हावी आणि शिवाजी महाराजांचा आदर्श आणि शिवविचारांची गोडी लागावी हाच उद्देश ठेवून ह्या स्पर्धा आयोजित केल्या जात असून मुलांनी जास्तीत जास्त पर्यावरणपूरक बाबी वापरून किल्ले बनवले याचे मनापासून समाधान वाटत आहे.

स्पर्धेमधील पहिल्या पाच विजेत्यांना ट्रॅव्हल बॅग,मनगटी घड्याळ,स्कूल बॅग,क्रिकेट बॅट,बॅडमिंटन किट असे साहित्य देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना मानधनाचे पाकीट देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेमध्ये 50 स्पर्धकांनी भाग घेतला होता.

या स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक गौरव वाघमारे,द्वितीय क्रमांक सार्थक लंके,तृतीय क्रमांक भारत शिंदे,चतुर्थ क्रमांक क्षितिज मोरे, पंचम क्रमांक सतेज असवले व ज्या मुलांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्यांना देखील मंडळाच्या वतीने बक्षीस देण्यात आले आहे. टाकवे सोसायटीचे माजी संचालक व मंडळाचे माजी अध्यक्ष दिलीप आंबेकर यांनी आभार ( Maval ) मानले.

https://www.youtube.com/watch?v=HesMVb0El_Y&pp=ygUIbXBjIG5ld3M%3D

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.