Maval : दत्तनगर, शंकरनगरमध्ये आमदार चाबुकस्वार यांची प्रचारात जोरदार मुसंडी

एमपीसी न्यूज- शिवसेना, भाजपा, आरपीआय महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ आमदार ॲड गौतम चाबुकस्वार यांनी शुक्रवारी (दि. 19) दत्तनगर,व शंकरनगर भागातील प्रत्येक घराघरात प्रचार फेरी काढून भेटीगाठी घेतल्या.

शुक्रवारी दुपारी चार वाजता आमदार चाबुकस्वार यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक प्रमोद कुटे, माजी नगरसेविका जयश्री वाघमारे, गणेश ठाकूर, भाजपाचे गणेश लंगोटे, विभाग प्रमुख अनिल पारचा, डाॅ जयदीप भालशंकर यांच्यासह सेना, भाजपचे चाळीस कार्यकर्ते सहभागी झाले होते. प्रत्येक घरात तसेच दुकानात जाऊन आमदार व त्यांच्याबरोबरच्या कार्यकर्त्यांनी पत्रक व अहवाल वाटत बारणे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. सुमारे 15 हजार मतदार असलेला हा परिसर सेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.