Maval: सर्वांगीण विकासासाठी, मतदार संघ हवा भाजपसाठी, ‘मिस्डकॉल ‘ करुन पाठिंबा देण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपची युती झाली असली तरी, शिवसेनेच्या ताब्यातील मावळ मतदार संघावरील भाजपने दावा सोडला नाही. ‘मावळच्या सर्वांगीण विकासासाठी, मतदार संघ हवा भाजपसाठी’ या टॅगलाईनखाली भाजपने मावळातून निवडणूक लढविण्याकरिता शुक्रवार (दि.1)पासून ‘मिस्डकॉल’ मोहीम राबविली आहे. 8080231231 या नंबरवर ‘मिस्डकॉल’ देऊन पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काल दुपारपासून आत्तापर्यंत 13 हजार लोकांनी ‘मिस्डकॉल’ देऊन पाठिंबा दिल्याचे भाजपकडून सांगण्यात आले.

मावळ मतदार संघ भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांना देण्याची भाजप नगरसेवक, कार्यकर्त्यांची मागणी आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, निवेदन देऊन आमदार जगताप यांच्यासाठी मावळ मतदार संघ भाजपकडे घेण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे. हा मतदार संघ भाजपला मिळावा यासाठी पक्षाकडून कालपासून ‘मिस्डकॉल’ मोहिम राबविण्यास सुरुवात केली आहे. काल दुपारपासून आत्तापर्यंत13 हजार लोकांनी ‘मिस्डकॉल’ देऊन पाठिंबा दिल्याचे भाजपकडून सांगण्यात आले. नागरिकांचा पाठिंबा घेत आहोत. नागरिकांचा भाजपच्या उमेदवाराला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

मावळ मतदार संघात भाजपची ताकद जास्त आहे. पिंपरी-चिंचवड, पनवेल महापालिका, तळेगाव दाभाडे, लोणावळा नगरपरिषद, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे या मतदार संघावर भाजपची दावेदारी वाढत आहेत. भाजपच्या उमेदवार सक्षमपणे लढत देऊ शकतो. त्यामुळे युतीच्या उमेदवाराचा पराभव होऊ नये. यासाठी हा मतदार संघ भाजपला देण्याची मागणी करण्यात येत असल्याचे, भाजपकडून सांगण्यात आले. काल दुपारपासून सुरु केलेल्या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. आत्तापर्यंत 13 हजार लोकांनी ‘मिस्डकॉल’ देऊन पाठिंबा दिल्याचे भाजपकडून सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.