Maval : दारुंब्रे-कासारसाई रस्त्याचे भूमिपूजन संपन्न

संत तुकाराम कारखान्याकडे जाणारा रस्ता होणार प्रशस्त

एमपीसी न्यूज – पवन मावळातील दारुंब्रे-कासारसाई रस्त्याच्या (Maval) कामाचे भूमिपूजन मंगळवारी (दि. 6) संपन्न झाले. या रस्त्याच्या कामासाठी मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या प्रयत्नातून 2 कोटी 85 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.

या भूमिपूजन समारंभ प्रसंगी संचालक संत तुकाराम साखर कारखाना सुभाष राक्षे, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती नथू वाघमारे, अमोल मोकाशी, नितीन मुऱ्हे, कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस सोमनाथ वाघोले, तालुकाध्यक्ष युवक काँग्रेस राजेश वाघोले, अध्यक्ष राष्ट्रवादी शिरगाव भानुदास गोपाळे, सरपंच दारुंब्रे उमेश आगळे, माजी उपसरपंच गणेश वाघोले, ईश्वर वाघोले, काळुराम वाघोले, भरत लिम्हन, बाळासाहेब मोकाशी, युवराज केदारी, उमेश केदारी, निलेश राक्षे, अनिल वाघोले, विशाल वाघोले, जालिंदर वाघोले, संदीप सोरटे, शरद भालेकर आदि उपस्थित होते.

आमदार शेळके यांच्या पाठपुराव्यातुन अर्थसंकल्पीय कामे 2022-23 अंतर्गत प्रजिमा 157 या कासारसाईकडे जाणाऱ्या मार्गावर सुमारे साडे सहा किलोमीटर रुंदीकरण व सुधारणा करण्यात येणार आहेत. सद्यस्थितीत अरुंद असलेल्या साडेपाच मीटर रस्त्याचे रुंदीकरण करुन सात मीटर रुंद असा प्रशस्त रस्ता करण्यात येणार आहे. साईडपट्ट्यांचे देखील काम होणार आहे.

संत तुकाराम कारखान्याकडे जाणारे (Maval) ट्रक, ट्रॅक्टर ट्रॉली अशा अवजड वाहनांची संख्या या मार्गावर मोठ्या प्रमाणात असते. ऊस वाहतूकीच्या हंगामात अवजड वाहनांच्या संथ गतीमुळे वारंवार वाहतूक कोंडी होत असते.

मुळशी तालुक्यात व आयटी पार्ककडे जाणारा हा एक मुख्य रस्ता आहे. तसेच कासारसाई धरण परिसरात येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यादृष्टीने रस्ता रुंद व्हावा अशी नागरिकांकडून वारंवार मागणी होत होती. आता रुंदीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर या भागातील नागरिकांची वाहतूक कोंडी पासून देखील सुटका होणार आहे. याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

Chinchwad : सरकारी कामाचे टेंडर मिळवून देण्याच्या बहाण्याने महिलेची 25 लाखांची फसवणूक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.