Maval: परीक्षेपूर्व तयारीबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

एमपीसी न्यूज – परीक्षेची तयारी कशी करावी? परीक्षेची भीती न बाळगता , विविध युक्ती वापरून प्रश्नाचे उत्तर लक्षात कसे ठेवायचे? पेपरचे टेंशन न घेता सोप्या पद्धतीने उत्तरे कशी लिहायची? अश्या विविध विषयांची उत्तरे “परीक्षेपूर्व तयारी आणि नेतृत्त्व गुण” या कार्यशाळे मध्ये ट्रेनर रिता शेटीया यांनी दिली.

लीला पूनावाला फाउंडेशनच्या वतीने नुकतेच एकदिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन गोल्डन ग्लेडस माध्यमिक विद्यालय, करंजगाव, तालुका – मावळ येथे लीला सिनिअर मधील लीला सिनिअर्ससाठी “परीक्षेपूर्व तयारी आणि नेतृत्त्व गुण” या कार्यशाळेचे आयोजन केले होते.

_MPC_DIR_MPU_II

स्वत: ला अभ्यासासाठी पुरेसा वेळ द्या. उत्तरे लिहिताना फ्लो चार्ट आणि डायग्राम चा वापर करा. उत्तरे लिहिताना उदाहरणांचा वापर करावा. जुन्या प्रश्न पत्रिका सोडवण्याचा सराव करावा. प्रश्न आणि उत्तरे यावर गट चर्चा करावी. नियमित ब्रेक घ्यावा. आपल्या परीक्षेच्या दिवसाची योजना करा. टाइम टेबल बनवा.उत्तरे लक्षात ठेवण्यासाठी काही युक्त्या वापराव्यात. नेतृत्व गुणांचा वापर करून गटामध्ये चर्चेत सहभागी व्हा. नेतृत्त्व गुणांचा वापर तुम्ही अभ्यास करत असताना , खेळ खेळताना , ऍक्टिव्हिटी करताना कशा प्रकारे अमलात आणू शकता आणि तुमच्या अंतिम ध्येया पर्यंत पोहचू शकता.

काही खेळांमधून :स्वतःला जिंकायचे असेल तर दुसऱ्याला हरवण्याचा प्रयत्न न करता स्वतःला इतके सक्षम बनवा कि तुमच्या कार्यक्षमतेने तुम्ही जिंकाल. हे या कार्यशाळेतून विविध ऍक्टिव्हिटी आणि लीला सिनिअर्स बरोबर झालेल्या चर्चा मधून दाखवण्यात आले. प्रशिक्षण झाल्यानंतर प्रमाणपत्र देण्यात आले.

अर्चना ननावरे म्हणाली, या प्रक्षिशणामुळे आमच्या मनातील परीक्षेची भीती दूर झाली. तसेच सोप्या पद्धतीने उत्तरे कशा प्रकारे लिहायची आणि लक्षात ठेवायची हेही कळाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.