Maval : मावळाने अनेक आमदार निवडून दिले पण यावेळी जनता मंत्री निवडणार – रवींद्र भेगडे

मावळात भाजपची सत्ता पुन्हा येणार

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्याने आजपर्यंत अनेक आमदार निवडून दिले आहे. पण यावेळी पहिल्यांदाच इतिहास होणार आहे. कारण मावळची जनता यावेळी मंत्री निवडून देणार आहे, असे मत प्रचारप्रमुख आणि भाजप नेते रवींद्र भेगडे यांनी प्रचारादरम्यान व्यक्त केले आहे. मावळ तालुका भाजपचा बालेकिल्ला असून पुन्हा भाजपची सत्ता येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आत्तापर्यंत तालुक्यातील रस्ते, वीज, पाणीपुरवठा या समस्या फक्त युतीच्याच काळात संपल्या आहेत. इथून पुढच्या काळात पर्यटन, शेती, दुग्धव्यवसाय, स्वयंरोजगार या माध्यमातून महिला व तरुणांना रोजगार देण्याचा विश्वास रवींद्र भेगडे यांनी यावेळी दाखविला. तालुक्याला मंत्रिपद मिळाल्याने आपल्या तालुक्याची प्रतिमा राज्यात उंचावली आहे. मोठ्या प्रमाणात तालुक्याचा विकास होणार आहे. शासनाच्या विविध योजना या मंत्रिपद मिळाल्याने तालुक्यात आणता येणार आहे. आमदार असताना मर्यादा असतात परंतु मंत्रिपद आल्यावर विकासाला गती मिळणार आहे.

गावातील ८३ शाळकरी मुले दत्तक

राज्यमंत्री संजय भेगडे आणि पक्षातील काही सदस्यांनी मावळ मधील माळेगाव खुर्द येथे आंदर मावळ शिक्षण संस्था स्थापन केली. त्याअंतर्गत दुर्गम भागातील ८३ शाळकरी मुले दत्तक घेतली आहे. ज्यांचा शिक्षणाचा, खाण्यापिण्याचा आणखी इतर सर्व खर्च राज्यमंत्री स्वतः पाहतात. गेल्या दीड वर्षांपासून संस्था स्वखर्चाने चालवितात त्या मुलांनी आज बाळा भेगडे यांचे उत्साहात स्वागत केले.

योजनांचा गावकऱ्यांना लाभ

शनिवारी आंदर मावळमध्ये चालू असलेल्या प्रचारामध्ये प्रत्येक गावातील नागरिक हा उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले दिसून येत होता. प्रत्येक गावातील नागरिक हा मिळालेल्या योजनांचे फायदे सांगत, आम्ही यावेळी पुन्हा मंत्रीच निवडून आणणार असल्याचे सांगत होता.

नागरिकांच्या प्रतिक्रिया –

आमदार बाळा भेगडे यांनी रस्त्यासाठी आणि पाण्यासाठी भरघोस मदत करून आमच्या गावाला प्रगतीच्या दिशेने नेण्याचे काम केले आहे. त्यामुळे आम्हाला यावेळी आमदार नको मंत्रीच हवा ज्यामुळे मावळचा विकास होईल.

– शंकर पिंपरकर – पिंपरी गाव

बाळा भेगडे यांनी आमचे गाव दत्तक घेतल्यापासून गावात रस्ते, पाणीसुविधा आणि स्मशानभूमी या बाबतीत खूप प्रगती झालेली आहे. त्यामुळे आमच्या गावातून भरघोस मतदान हे फक्त बाळा भेगडे यांनाच देऊन आमचा मावळातून मंत्री निवडून देणार आहोत.

माळेगाव खुर्द – शंकर बोऱ्हाडे ग्रामपंचायत सदस्य

रस्त्यांची सुविधा, लाईटीची व्यवस्था, सभामंडपाचे काम काही प्रमाणात मार्गी लागले असून उर्वरित काम मार्गी लागणार आहे. त्यामुळे आम्ही बाळा भेगडे यांना प्रचंड बहुमताने निवडून देणार आहोत.

कुणेवाडी -सुदाम सुपे

सभामंडपाचे काम, स्मशानभूमी, कामगार योजनेचा आत्तापर्यंत 70 लोकांना लाभ मिळाला आहे. 20 लोकांना घरकुल मंजूर, 80 महिलांचे विमा, पाणी सुविधा करून दिली.

-किवळे- पंढरीनाथ वायकर

राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यामार्फत गावाला रस्ता, स्मशानभूमी, गावात येणारा मुख्य रस्ता, पूल, शाळकरी मुलांसाठी अंगणवाडी, सांस्कृतिक भवन यांसारख्या अनेक सुविधा पुरविल्या आहे. त्यामुळे यावेळी आम्ही गावातून भरघोस मतदान मिळवून देणारा आणि तालुक्याला आमदार नाही तर मंत्रीच देणार, असा निर्धार केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.