Maval: मावळात इतिहास घडणार अन मंत्रीच निवडून येणार -एकनाथराव टिळे

एमपीसी न्यूज – पुण्यामधील मावळ तालुक्यातील जे विकास कामांचे मोठे निर्णय प्रलंबित होते, ते बाळभाऊ भेगडे यांनी मंत्री होताच मार्गी लावले आहेत, असे मत माजी सभापती एकनाथराव टिळे यांनी व्यक्त केले आहे.

मंगळवारी परंदवडी, धामणे, बेबेडओहोळ, आढले बु., डोणे, राजेवाडी, ओव्हळे, दिवड, पुसाने, आढले खुर्द आणि चांदखेड गावकऱ्यांनीही बाळा भेगडे यांना साथ देत यावेळी विकास करणाऱ्या आमदाराला नाही तर, तालुक्याचे नाव सर्व राज्यात उजळवणाऱ्या मंत्र्यांना साथ देण्याचा निर्धार केला.

ओव्हळे गावात महिलांनी जोरदार घोषणा देत बाळभाऊ यांचे स्वागत केले. आमचे गाव दत्तक घेतले असल्यामुळे आमच्या बाळाभाऊंनी आमच्यासाठी काय कामे केली आहेत ती बाकीच्या लोकांनी सांगायची गरज नाही. आज गावाला रोड मिळाल्याने येथील नागरिक सुखरूपपणे प्रवास करतो आहे. गावात अनेक सुखसुविधा मिळाल्या आहेत अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

आजूबाजूच्या इतर गावातील नागरिकांनी ही यावेळी भेगडे यांच्याविषयी आपले मत मांडले. त्यांच्यामुळे गावातील नागरिकांना मिळालेल्या फायद्यांचेही यावेळी वाचन करण्यात आले. विविध सरकारी योजना गावात आल्यामुळे गोरगरीब जनतेला त्याचा खूप फायदा झाला.

आज प्रत्येकाच्या घरात सिलेंडर गॅस आहे. काही नागरिकांना घरकुल योजनेचा फायदा झाला. काही नागरिकांना बांधकाम मजूर योजनेचा फायदा झाला. अशा अनेक योजना तालुक्यात आल्याने नागरिकांना त्याचा खूप फायदा झाल्याचे नागरिक सांगत होते. त्यामुळे यावेळी बाळा भेगडे विजयी झाल्याने त्यांना महत्वपूर्ण पद मिळून तालुक्याच्या विकासाला नक्कीच चालना मिळेल, असा विश्वास यावेळी नागरिकांनी व्यक्त केला.

भारतीय जनता युवा मोर्चा पुणे जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब घोटकुले म्हणाले, गावासाठी मंदिर, गावासाठी रोडची व्यवस्था, घरकुल योजना, विमा योजना, बांधकाम मजूर योजना, श्रावण बाळ योजना, संजय गांधी योजना अशा अनेक कामे राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी आमच्या गावासाठी केलेली आहेत. त्यांच्यामुळे आमच्या गावचा बराचसा विकास झाला आहे.

भाजपा मावळ तालुका युवा मोर्चा सरचिटणीस दिलीप शिंदे म्हणाले, गावामध्ये येणार रस्त्याचे काम यामुळे बऱ्याचशा मोठ्या शहरांना हा रस्ता जोडल्याने गावातील नागरिकांना याचा खूप फायदा झाला आहे.

भाजप जनता पार्टीचे ओवळे अध्यक्ष श्रीधर साठे म्हणाले, साकव पुलाचे काम झाल्याने मुख्य रस्त्याला अंतर्गत वाड्या वस्त्या जोडल्या गेल्या. वनविभाग अंतर्गत बंधाऱ्यांची कामे आणि जलयुक्त शिवाराची झाली आहेत. गावामध्ये स्वतंत्र पाण्याची टाकी मिळाली आहे.

भाजपचे युवा नेते सचिन कारेकर म्हणाले, 147 नागरिकांना घरे मिळाली, बांधकाम मजूर योजनेचा 105 लोकांना फायदा, राजीव गांधी आणि श्रावण बाळ योजनेचा सर्व ग्रामस्थांना फायदा झाला आहे.

माजी ग्रामपंचायत सदस्य पुसाणेचे शांताराम वाजे म्हणाले, ज्यांना कोणाला वाटत असेल की आमदार साहेबांनी कामे केली नाहीत त्यांनी आमच्याकडे यावे साहेबांची विकासकामे आम्ही तुम्हाला दाखवितो, असे मत पुसाने गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य शांताराम वाजे यांनी व्यक्त केले.

तसेच गावातील शेतकरी कर्ज माफी 111, बांधकाम मजूर योजनेचा 39, घरकुल योजना 105, अपंग व्यक्ती योजनेचा 3, संजय गांधी निराधार 10 अशा अनेक योजनांनी गावकऱ्यांचा खूप फायदा झाला आहे. आता आमचे गाव सर्व सुख-सुविधांनी परिपूर्ण झालेले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.