Maval : मावळ वारकरी सेवा समितीच्या वतीने वारकऱ्यांचा सन्मान

एमपीसी न्यूज – श्रीक्षेत्र आळंदी ते श्रीक्षेत्र पंढरपूर अशी पायी वारी (Maval) करणाऱ्या वारकऱ्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार, सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. ते वर्षानुवर्षे करत असलेल्या हरिभक्तीबाबत या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. हभप दिलीप महाराज खेंगरे यांच्या संकल्पनेतून व मावळ वारकरी सेवा समिती मित्र परिवाराच्या वतीने संस्कार शाळा दहिवली येथे हा सन्मान सोहळा पार पडला.

या उपक्रमात प्रामुख्याने हभप गणेश महाराज जांभळे, अमोल भेगडे, खंडू आहेर, शिवभक्त विजय तिकोणे यांनी हा सोहळा यशस्वी करण्यात सहकार्य केले. यात पायी वारी करणारे वारकरी यांना निमंत्रित करून हरिपाठ, प्रवचन, पाद्यपूजन वारकरी पूजन व महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले.

Sangavi News: यंदा सांगवीत भरणार पवनाथडी जत्रा

यावेळी दिंडी समाजाचे अध्यक्ष तुकाराम गायकवाड आणि बैलजोडीचे मालक (Maval) हभप बबन सातकर, योगेश सातकर, शांताराम ढाकोळ उपस्थित होते.

मावळमध्ये प्रथमच असा सोहळा झाला. निष्ठावान वारकरी हेच खरे पूजनीय आहेत आणि यांची सेवा देवाला आवडणारी आहे. या भावनेने हे नियोजन यशस्वी केले. यामध्ये आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना अनेक वारक-यांना भावना अनावर झाल्या. आजपर्यंत फक्त पांडुरंगाची सेवा केली. कुठल्याही मानाची सन्मानाची अपेक्षा न करता, पण आज या सन्मानातून आज सेवेचे सार्थक झाले अशा भावना व्यक्त केल्या. आश्रमातील स्वामीजी यांच्या सानिध्यात हा कार्यक्रम संपन्न झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.