Maval HSC Result : बारावीच्या निकालात मावळचा शेवटून पहिला क्रमांक

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Maval HSC Result) वतीने घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि. 25) जाहीर झाला. पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्याचा एकंदरीत सर्वाधिक (95.30 टक्के) निकाल लागला. तर मावळ तालुक्याचा सर्वात कमी (87.28 टक्के) निकाल लागला.

मावळ तालुक्यातील देहूरोड येथील शिवाजी विद्यालय, तळेगाव दाभाडे इंद्रायणी महाविद्यालय, लोणावळा डी. पी. मेहता कनिष्ठ महाविद्यालय, पवना ज्युनिअर कॉलेज पवनानगर, कामशेत येथील पंडित नेहरू विद्यालयात या प्रमुख पाच केंद्रांवर चार हजार 372 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील तीन हजार 816 विद्यार्थी पास झाले तर 556 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले.

Maval HSC Result : बारावीच्या परीक्षेत इंद्रायणी महाविद्यालयाची घवघवीत यशाची परंपरा याही वर्षी कायम, इंद्रायणी महाविद्यालयाची विद्यार्थिनी तालुक्यात पहिली

मावळ तालुक्यात एकूण चार हजार 400 पैकी दोन हजार 359 मुलांनी तर दोन हजार 41 मुलींनी नोंदणी केली. त्यातील चार हजार 372 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात दोन हजार 343 मुले आणि दोन हजार 29 मुलींचा समावेश आहे.

परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांमधून एक हजार 946 मुले आणि एक हजार 870 मुली असे एकूण तीन हजार 816 विद्यार्थी (Maval HSC Result) पास झाले. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 83.05 टक्के तर मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 92.16 टक्के एवढे आहे. तालुक्याचा एकंदरीत 87.28 टक्के एवढा निकाल लागला आहे. मावळ तालुक्याची कामगिरी जिल्ह्यात सर्वात कमी झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.