Maval: मावळमधील पराभवाची सर्वस्वी जबाबदारी माझी – अजित पवार

एमपीसी न्यूज – मावळमध्ये पार्थ पवार याच्या झालेल्या पराभावाची जबाबदारी सर्वस्वी माझी आहे. जनतेने दिलेला कौल आम्ही स्वीकारला आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा मावळ लोकसभा मतदारसंघात धक्कादायकरीत्या पराभव झाला. शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी पार्थ यांचा तब्बल सव्वा दोन लाखाच्या मताधिक्याने पराभव केला. पार्थ पवार यांच्या रूपाने 50 वर्षात पहिल्यांदाच पवार घराण्यातील सदस्याचा पराभव झाला आहे.

  • या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार याच्या झालेल्या पराभवाची सर्वस्वी जबाबदारी माझीच आहे. जनतेने दिलेला कौल आम्ही स्वीकारला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.