Maval: ग्रामीण भागाच्या विकासासाठी श्यामाप्रसाद मुखर्जी रुरबन अभियान प्रभावीपणे राबवा -आमदार शेळके

Maval: Implement Shyama Prasad Mukherjee Rurban Campaign Effectively for Rural Development - MLA Shelke श्यामाप्रसाद मुखर्जी रुरबन अभियान योजनेअंतर्गत मावळ तालुक्यातील कान्हे, कामशेत, कुसगाव, चिखलसे, जांभूळ, साते या गावांचा समावेश आहे

एमपीसी न्यूज – ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी श्यामाप्रसाद मुखर्जी रुरबन अभियान या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली पाहिजे, अशी सूचना मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केली.

वडगाव मावळ येथे पंचायत समिती सभागृहात ‘श्यामाप्रसाद मुखर्जी रुरबन अभियानाचा’ आढावा घेण्यासाठी आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस गटविकास अधिकारी सुधीर भागवत, सहाय्यक गटविकास अधिकारी वाजे, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा, बांधकाम विभाग अधिकारी, सर्व ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.

रुरबन अभियान योजनेअंतर्गत मावळ तालुक्यातील कान्हे, कामशेत, कुसगाव, चिखलसे, जांभूळ, साते या गावांचा समावेश आहे.  या अभियानाअंतर्गत निवडलेल्या क्षेत्राचा सर्वांगीण नियोजनबद्ध विकास करणे हा मुख्य उद्देश आहे. परंतु प्रशासन स्तरावर मागील काही वर्षात प्रारूप आराखडा तयार असूनही त्याचा पाठपुरावा झालेला दिसत नसल्याबद्दल शेळके यांनी नाराजी व्यक्त केली.

सदर योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आला. पायाभूत सुविधांसाठी असलेल्या निधीचा विनियोग आणि स्थानिकांना त्याचा होणारा लाभ या सर्व बाबींचा विचार करून या पायाभूत सुविधांच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवणे आवश्यक आहे. कुठलीही विकास कामे करताना स्थानिक लोकप्रतिनिधींचाही सहभाग असणे, त्यांची मते जाणून घेणे आवश्यक आहे. या बैठकीत सर्व स्थानिक लोकप्रतिनिधींशी प्रलंबित कामे, समस्या तसेच पुढील नियोजन यावर चर्चा करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.